सई लोकूरने हा फोटो पोस्ट करून पुन्हा चाहत्यांना पाडलं कोड्यात

By  
on  

सध्या सोशल मिडीयावर चर्चा आहे ती सई लोकूरची. त्याचं कारणही तसचं आहे. मराठी बिग बॉसच्या पर्वात लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री सई लोकूर सध्या प्रेमात असल्याचं सांगतेय. सोशल मिडीयावर तिने एका व्यक्तिसोबतचा पाठमोरा फोटोही पोस्ट केला होता. शिवाय तिला तिचा जोडीदार सापडला असल्याचं तिने म्हटलं होत.

त्यानंतर सईने नुकतच तिच्या मेहेंदीचे फोटो, व्हिडीओ पोस्ट केले. आता जोडीदाराविषयी बोलल्यानंतर थेट मेहेंदी सोहळ्याचे फोटो पोस्ट केले म्हटल्यावर मग चाहत्यांचीही उत्सुकता वाढली आहे. सई लोकूर आता लवकरच लग्न करणार की काय अशा चर्चांना उधाण आलय.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

And here he comes ️ . #mydimpledguy

A post shared by Sai Lokur (@sai.lokur) on

 

यातच सईने आता पुन्हा असाच एक पाठमोरा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत सईचा चेहरा दिसतो पण तिचा जोडीदार पाठमोरा आहे. सईच्या हातावर चढलेली मेहेंदीदेखील पाहायला मिळतेय. मात्र आता ही व्यक्ती नेमकी आहे तरी कोण याचीच सगळ्यांना उत्सुकता लागली आहे.

Recommended

Loading...
Share