By  
on  

पाहा Video : "ही चाल तुरु तुरु" गाण्यावर अमेय वाघचा स्वॅग

अभिनेता अमेय वाघचा ह्युमर त्याच्या सोशल मिडीयावरील पोस्टमध्येही पाहायला मिळतो. सोशल मिडीयावर त्याचे विविध मेजशीर व्हिडीओ पाहायला मिळतात. अमेयने नुकताच आणखी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. 

अंताक्षरी खेळताना एक गाणं सगळे हमखास म्हणतात ते म्हणजे "ही चाल तुरु तुरु" हे गाणं. आणि याच गाण्यावर अमेयने स्लो मोशन व्हिडीओ केला आहे. या व्हिडीओत नेहमीप्रमाणे अमेयचा स्वॅग पाहायला मिळतोय. त्याच्या चाहत्यांनाही त्याचा हा व्हिडीओ आवडला आहे.

अमेय या पोस्टमध्ये लिहीतो की, "लहानपणी अंताक्षरी मध्ये हे गाणं मनापासून गायले असाल तर एक हार्ट वर करा !" शिवाय जर हे गाणं अंताक्षरीत गायले असाल तर एक हार्ट म्हणजेच या पोस्टला लाईक करण्यासाठी अमेय सांगत आहे. मग काय चाहत्यांनीही त्याच्या या पोस्टवर लाईक्सचा वर्षाव केला आहे.

 

 

अमेय हा त्याच्या सिनेमांप्रमाणे सोशल मिडीयावरील पोस्टमधूनही चाहत्यांचं मनोरंजन करत असतो. लॉकडाउनमध्ये तर अमेयने युट्यूब चॅनेल सुरु करून आणि विविध व्हिडीओ करून चाहत्यांचं मनोरंजन केलं.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive