By  
on  

नाटकाच्या उद्घोषणेत होणार असा बदल, नाट्यसृष्टीची सैन्याला अशीही मानवंदना

काश्मीरमधील पुलवामा येथे लष्करांच्या गाडीवर झालेल्या भ्याड हल्ल्याचे पडसाद संपुर्ण देशावर उमटत आहेत. पाकिस्तानला धडा शिकवा. पाकिस्तानचा बदला घ्या असंच सर्वजण सोशल मिडीया आणि सर्वत्र बोलताना पाहायला मिळतायत.  शिवाय शहीदांच्या कुटुंबांना मदत करण्यासाठी अनेक हात पुढे आले आहेत. या हल्ल्याने देशाची झालेली अपरिमित हानी भरून न निघण्यासारखी आहे. अनेक ठिकांणी शहिदांना श्रद्धांजली देखील वाहिली गेली. मराठी नाट्यसृष्टीनेही भारतीय सैन्य दलाचं ऋण अनोख्या पद्धतीने चुकवण्याचं ठरवलं आहे. कोणतंही मराठी नाटक सुरु होताना सर्वप्रथम उद्घोषणा केली जात आहे. ‘रंगदेवता आणि मराठी नाट्यरसिक यांना विनम्र अभिवादन करून....’ अशा प्रकारची उद्घोषणा यापुर्वी केली जात असे.

पण आता ‘रंगदेवता, नाट्यरसिक आणि भारतीय सैन्याला विनम्र अभिवादन करून सादर करीत आहोत..’ प्रत्येक प्रयोगापुर्वी अशी उद्घोषणा करुन नाटकाला सुरुवात केली जाणार आहे. मराठी नाट्यसृष्टीने भारतीय सैन्याला अशा अनोख्या पद्धतीने मानवंदना दिली आहे.

 

Recommended

PeepingMoon Exclusive