By  
on  

पाहा Video : सई लोकूर आणि तिर्थदीप रॉय यांच्या साखरपुड्याचा रोमँटिक व्हिडीओ देत आहे #Couplegoals

अभिनेत्री सई लोकूरच्या साखरपुड्याच्या बातमीने सगळ्यांचच लक्ष वेधलं. गेले काही दिवस पाठमोरे फोटो पोस्ट करून कोड्यात पाडणाऱ्या सईने अखेर तिच्या जोडीदाराचा चेहरा समोर आणला आहे. एवढच नाही तर त्यांचा साखरपुडाही पार पडला आहे. सई लोकूर आणि फियान्से तिर्थदीप रॉय या दोघांचा साखरपुडा सोहळा नुकताच पार पडला. यावेळी सई प्रचंड आनंदी दिसली. सईने सोशल मिडीयावर तिर्थदीपसोबतचे तिच्या साखरपुड्याचे फोटो पोस्ट करून सगळ्यांना ही गुड न्यूज दिली आहे.

सईने साखपुड्याच्या फोटोंसह नुकताच साखरपुड्याचा व्हिडीओही पोस्ट केला आहे. या व्हिडीओत सई आणि तिर्थदीप दोघांचा रोमँटीक अंदाज पाहायला मिळतोय. फोटोशुटदरम्यानचे खास क्षण या व्हिडीओत पाहायला मिळत आहेत. सुरुवातीला सई आणि तिर्थदीपने साखरपुडा सोहळ्याच्या ठिकाणी ग्रँड एन्ट्री घेतली. त्यानंतर तिर्थदीपने गुडघ्यावर बसून सईला एन्गेजमेंट रिंग घातली. त्यानंतर दोघांसाठी खास डिझाईन केलेला केक कापण्यात आला. 

 

साखरपुड्यानिमित्ताने सईवर आता सोशल मिडीयावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आता सई आणि तिर्थदीप दोघं लग्नबंधनात कधी अडकणार हे पाहणं औत्सुक्याचं असेल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive