By  
on  

गायक आदर्श शिंदेच्या आवाजात असं रेकॉर्ड करण्यात आलं 'दख्खनचा राजा जोतिबा'चं शीर्षकगीत

'दख्खनचा राजा जोतिबा' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कोठारे विजनच्या या मालिकेची अनेकांना उत्सुकता आहे. नुकतच या मालिकेच्या शीर्षकगीताचं रेकॉर्डिंग करण्यात आलं आहे. प्रसिद्ध गायक आदर्श शिंदेने हे शीर्षकगीत गायलं आहे. 

आदर्शने नुकतच सोशल मिडीयावर या रेकॉर्डिंग दरम्यानचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. आदर्शच्या आवाजात हे शीर्षकगीत ऐकायला जबरदस्त वाटतय. आदर्शने आत्तापर्यंत मालिकांसाठी आणि सिनेमांसाठी गायलेली बरीच गाणी लोकप्रिय ठरली आहेत. तेव्हा हे शीर्षकगीत या मालिकेची उत्सुकता आणखी वाढवतय.

 

येत्या 23 ऑक्टोबर पासून 'दख्खनचा राजा जोतिबा' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

आदर्शने याआधी कोठारे विझनच्या मालिकांसाठी शिर्षक गीत गायलं आहे. 'जय मल्हार', 'विठू माऊली' या कोठारे विजनच्या मालिकांसाठी आदर्शने याआधी शीर्षकगीत गायली आहेत. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive