By  
on  

प्रत्येकाला आपलासा वाटणाऱ्या 'आम्ही बेफिकर'चा पाहा ट्रेलर

कॉलेजची चार-पाच वर्षं म्हणजे अगदी मंतरलेलं जग असतं. मित्र-मैत्रिणी, धमालमस्ती, राडे-भांडणं, प्रेम-प्रेमभंग असा सगळा माहौल या कॉलेजच्या दिवसांत प्रत्येकाला अनुभवायला मिळतो. "आम्ही बेफिकर" या चित्रपटातून कॉलेजचं हे जग आता पुन्हा एकदा पडद्यावर अवतरणार आहे. सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलेल्या चित्रपटाच्या ट्रेलरमधूनही हाच प्रत्यय येत आहे. म्हणूनच "आम्ही बेफिकर" हा प्रत्येकाला नक्कीच आपलासा वाटेल.

हरिहर फिल्म्सच्या नागेश मिश्रा, अंतरिक्ष चौधरी, कविश्वर मराठे आणि रोहित चव्हाण यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे तर रोहित पाटील हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. चित्रपटाचं दिग्दर्शन कविश्वर मराठे यांचं आहे. चित्रपटात सुयोग गोऱ्हे आणि मिताली मयेकर ही नवी जोडी "आम्ही बेफिकर" या चित्रपटात दिसणार आहे. सुयोग आणि मिताली अनेक मालिका-चित्रपटांतून आपल्यापुढे आले आहेत. मात्र, "आम्ही बेफिकर' हा त्यांचा एकत्रित पहिलाच चित्रपट आहे. त्यांच्यासह राहूल पाटील, स्वप्नील काळे आणि अक्षय हाडके यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. चित्तरंजन ढल यांनी कॅमेरामन म्हणून तर श्राधेय केदार, पंकज सळमुठे यांनी संकलक म्हणून काम पाहिले आहे. प्रणय अढांगळे यांनी चित्रपटाचे संगीत केले असून रोहित राऊत, हर्षवर्धन वावरे, कीर्ती किल्लेदार आणि सौरभ जोशी यांच्या सुमधुर आवाजात चित्रपटातील गाणी स्वरबद्ध करण्यात आली आहेत.

खूप काही मिळवण्याचा प्रयत्नात खूप काही गमावले आणि त्याच गमावलेल्या अनुभवातून पुन्हा स्वप्न रंगवले या आशयसूत्रावर हा चित्रपट बेतला आहे. आजच्या तरुणांशी संवाद साधणारा, त्यांच्या मनातले विचार पडद्यावर मांडणारा हा चित्रपट आहे. त्यामुळेच चित्रपटाचा लुकही यूथफुल असल्याचं आपल्याला ट्रेलरमधून पहायला मिळतं. उत्तम कलाकार, धमाल कथा, चटपटीत संवाद आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम असलेला 'आम्ही बेफिकर' हा चित्रपट पाहून प्रेक्षकही
'आम्ही बेफिकर' म्हणतील यात काहीच शंका नाही. ८ मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

 

https://youtu.be/YDFUuV72lSo

Author

Recommended

PeepingMoon Exclusive