By  
on  

सुबोध भावे आणि स्पृहा जोशी पहिल्यांदाच झळकणार एकत्र ?

अभिनेता सुबोध भावे हा मराठी मनोरंजन विश्वातील उत्तम अभिनेत्यांपैकी एक आहे. त्यासोबतच अभिनेत्री स्पृहा जोशीही तिच्या विविध भूमिकांमधून, तिच्या कवितांमधून चाहत्यांची मनं जिंकताना दिसते. मात्र हे दोन्ही गुणी कलाकार आता एकत्र पाहायला मिळणार असल्याचं चित्र पाहायला मिळालं.

सुबोध भावे आणि स्पृहा जोशी हे दोघं पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत. सुबोधने नुकतच सोशल मिडीयाच्या माध्यमातून स्पृहासोबतचा फोटो पोस्ट केला आहे. दोघांची इतकी वर्षे मैत्री आहे मात्र एकत्र काम करण्याचा योग काही आला नव्हता. मात्र या आगामी प्रोजेक्टसाठी दोघं एकत्र आले आहेत.

सुबोध त्याच्या पोस्टमध्ये लिहीतो की, "इतकी वर्षे एकाच क्षेत्रात आहोत पण या अत्यंत गुणी अभिनेत्री आणि मैत्रिणी बरोबर प्रत्यक्ष काम करण्याचा योग मात्र आज आला."

 

स्पृहासोबत पहिल्यांदाच काम करत असल्याचा आनंद सुबोधने या पोस्टमधून व्यक्त केला आहे. मात्र नेमकं कोणत्या गोष्टीसाठी दोघं एकत्र आले आहेत हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही..

Author

Recommended

PeepingMoon Exclusive