By  
on  

या हिंदी मालिकेत अभिनेत्री किशोरी शहाणे यांची आहे ही महत्त्वाची भूमिका

'गुम है किसी के प्यार में' ही नवी हिंदी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रोमोपासूनच ही मालिका लक्षवेधी ठरतेय. याचं मुख्य कारण म्हणजे या मालिकेच्या प्रोमोमध्ये चक्क दिसल्या बॉलिवुड एव्हरग्रीन रेखा. या मालिकेत रेखा दिसणार असं बोललं जातय. या मालिकेतून त्या टेलिव्हीजन डेब्यू करणार असल्याच्या चर्चा आहेत. मात्र ते नेमकं काय असेल हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. मात्र या मालिकेतील विविध पात्र आता समोर येऊ लागली आहेत. 

प्रसिद्ध अभिनेत्री किशोरी शहाणे यादेखील या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. किशोरी यांनी नुकतच सोशल मिडीयावर पोस्ट करून याविषयीची माहिती दिली आहे. या मालिकेत त्या भवानी नावाचं पात्र साकारत आहेत. त्याच्यां पात्राचा लुक कसा असेल हे दाखवणारा फोटो त्यांनी या पोस्टमध्ये जोडला आहे. 

 

किशोरी शहाणे यांचा वेगळा लुक या मालिकेत पाहायला मिळेल. याआधीही किशोरी या अनेक हिंदी मालिक तसेच हिंदी सिनेमांमध्येही झळकल्या आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive