परदेशात असलेल्या अभिनेत्री अश्विनी भावे या त्यांच्या सोशल मिडीयाच्या माध्यमातून विविध टिप्स देत असतात. अश्विनी या एक उत्तम अभिनेत्रीसोबतच त्यांना गार्डनिंग, झाडांची, फळा-फुलांची, कुकिंगचीही आवड आहे. भारताबाहेर परदेशात असलेल्या अश्विनी या त्यांच्या चाहत्यांसाठी विविध व्हिडीओ शेयर करत असतात. कधी त्या त्यांच्या गार्डनमध्ये झाडांविषयी, फळा-फुलांविषयी बोलतात तर कधी स्वयंपाक घरातील एखाद्या रेसिपीविषयी.
नुकताच अश्विनी यांनी एक उपयोगी व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओत त्या घरात भाज्या कशा उगवायच्या याविषयी सांगत आहेत. त्यांनी या व्हिडीओत याविषयीची कृती करुन दाखवली आहे. विविध पालेभाज्या कन्टेनरमध्ये कशा उगवायच्या या ते सांगत आहेत. अनेकांसाठी हा व्हिडीओ अत्यंत उपयोगी ठरू शकतो. सध्याच्या कोरोनाग्रस्त परिस्थितीत घरातच भाज्या उगवायचा हा उत्तम पर्याय आहे.
अश्विनी भावे या हॅशटॅग 'द ग्रिन डूर'च्या माध्यमातून विविध गोष्टी शेयर करत असतात. निसर्गाची आवड असलेल्या अश्विनी भावे यांनी याआधीही सोशल मिडीयावर अनेक व्हिडीओ पोस्ट केले आहेत.