नेहा पेंडसेने पोस्ट केले तिचे हे फोटो, नेहाच्या घायाळ करणाऱ्या अदा

By  
on  

सोशल मिडीयावर अनेक मराठी ग्लॅमरस अभिनेत्री त्यांचे फोटो पोस्ट करत असतात. या अभिनेत्रींचा सोशल मिडीयावर मोठा चाहतावर्ग आहे. अभिनेत्री नेहा पेंडसेदेखील सोशल मिडीयावर सक्रिय असते. तिचे विविध फोटो ती सोशल मिडीयावर पोस्ट करते. नेहाने स्वत:ला चांगलच फिट केलेलं आहे. शिवाय नेहाची ड्रेसिंग स्टाईलही लक्षवेधी ठरते.

मराठीसह हिंदी मालिकांमध्येही काम करणाऱ्या नेहाचा सोशल मिडीयावर मोठा चाहतावर्ग  आहे. तिच्या पोस्ट्सनाही हजारो लाईक्स आणि कमेंट्स असतात. नेहाने नुकतेच तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत. यात तिने निळ्या रंगाचा ब्लेझर परिधान केलाय. पजामा आणि क्रॉप टॉप सोबत ब्लेझर असलेला नेहाचा हा हटके लुक पाहायला मिळतोय. 

नेहाच्या या हटके लुकमधील फोटोंना हजारो लाईक्स मिळाले आहेत. 'भाबीजी घर पर है' या प्रसिद्ध हिंदी मालिकेत नेहा झळकणार असं बोललं जात होत. मात्र त्या मालिकेत झळकत नसल्याचं नेहाने नंतर स्पष्ट केलं. यावर्षी नेहाचं लग्न चर्चेत राहिलं. शार्दुल बायससोबत नेहाने यावर्षी लगीनगाठ बांधली होती.

Recommended

Loading...
Share