By  
on  

पाहा Video : ग्रहमख केळवणासाठी शर्मिष्ठा राऊतने होणाऱ्या पतीसाठी केली ही गोष्ट

अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत आणि तेजस तेसाई हे येत्या 11 ऑक्टोबरला लगीनगाठ बांधणार आहेत. दोघांचा लग्नसोहळा काही दिवसातच पार पडणार आहे. काही दिवसांपूर्वी दोघांचा साखरपुडाही पार पडला होता. आणि आता दोघं लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.

शर्मिष्ठाने सोशल मिडीयावर चक्क लग्नपत्रिकाच पोस्ट केली आहे. दोघांवरही आता शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यातच नुकतच ग्रहमख केळवण आणि मुहूर्त पार पडलं. यावेळी दोघं पारंपारिक वेशभुषेत दिसले. तर एकीकडे शर्मिष्ठा यासाठी तेजसची तयारी करताना दिसली. शर्मिष्ठाने हा व्हिडीओही सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे.

 

याशिवाय शर्मिष्ठाने सोशल मिडीयावर तेजससोबतचे अनेक फोटोही पोस्ट केले आहेत.

 

'हे मन बावरे' या मालिकेतील शर्मिष्ठाची भूमिका लक्षवेधी ठरली होती. शिवाय मराठी बिग बॉसच्या पहिल्या पर्वातही शर्मिष्ठा स्पर्धक म्हणून दिसली होती.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive