By  
on  

ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचं हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.  गुरुवारी सकाळी दहा वाजता त्यांच्या राहत्या घरी ठाणे येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 68 वर्षांचे होते.

अभिनेते अविनाश खर्शीकर यांनी सिनेमे, नाटक, मालिकांमधून आत्तापर्यंत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. 1978मध्ये त्यांनी सिनेविश्वातील कारकिर्दीला सुरुवात केली होती. 'बंदिवान मी या संसारी' हा त्यांचा पहिला सिनेमा आहे. त्यानंतर 'जसा बाप तशी पोरं', 'आधार', 'आई थोर तुझे उपकार', 'माझा नवरा तुझी बायको', 'चालू नवरा भोळी बायको', 'बकुळा नामदेव घोटाळे', 'घायाळ', 'लपवाछपवी', 'माफीचा साक्षीदार' या सिनेमांमधून त्यांनी विविध भूमिका साकारल्या. 

 'तुझं आहे तुजपाशी', 'सौजन्याची ऐशी तैशी', 'वासूची सासू', 'अपराध मीच केला', 'दिवा जळू दे सारी रात', 'लफडा सदन' त्यांची ही नाटकं प्रचंड गाजली. त्यांच्या निधनाने मराठी मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. अनेक हिंदी सिनेमांमध्येही त्यांनी काम केलेलं आहे.

 अनेक कलाकारांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive