By  
on  

पाहा Video : 'सुखी माणसाचा सदरा' मालिकेचा नवा प्रोमो रिलीज, मालिकेत आहेत या ज्येष्ठ अभिनेत्री

सध्या  'सुखी माणसाचा सदरा' या आगामी मालिकेची प्रचंड चर्चा आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या या मालिकेत अभिनेता भरत जाधव मुख्य भूमिकेत आहे. केदार शिंदे यांनी नुकताच या मालिकेचा प्रोमो सोशल मिडीयाच्या माध्यमातून समोर आणला होता. यात भरत जाधव त्यांचा सदरा शोधताना दिसले. प्रेक्षकांना आपली वाटणारी अशी मालिक असणार आहे. त्यामुळे छोट्या पडद्यावर ही मालिका कधी येईल याची अनेकांना उत्सुकता आहे. 

केदार यांनी नुकताच मालिकेचा नवा प्रोमो प्रदर्शित केला आहे. या नव्या प्रोमोत ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी पाहायला मिळत आहेत. या मालिकेच्या निमित्ताने भरत जाधव आणि रोहिणी हट्ट्ंगडी सारखे उत्तम कलाकार टेलिव्हिजवर पाहायला मिळतील. केदार यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहीलय की, " लवकरच कलर्स मराठीवर... असं चित्र सध्यातरी कुठल्याही चॅनेलवर दिसत नाही. सहज सोपं भेटीला आणतोय. आणि जे प्रोमो मधे दिसतंय तेच मालिकेत दिसेल याचं वचन देतो. टिपरे केलं आहे, त्यामुळे त्याच विश्वासावर हे तुम्ही नक्की पाहाणारच!"

 

तेव्हा सध्या टेलिव्हिजनवरील मालिकांच्या गर्दीत ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करेल आणि काहीतरी वेगळं पाहायला मिळेल यात शंका नाही.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive