By  
on  

Birthday Special :  अभिनेत्री स्पृहा जोशी बद्दलच्या या गोष्टी जाणून घ्या

अष्टपैलू आणि संवेदनशील अभिनेत्री आणि कवयित्री स्पृहा जोशीचा आज वाढदिवस आहे. 13 ऑक्टोबर 1989 मध्ये स्पृहाचा जन्म झाला. शिवाजी पार्क परिसरात तिचं बालपण गेलं आहे. बालमोहन विद्या मंदिरातून तिने शिक्षण पूर्ण केलं आहे. स्पृहाला लहानपणापासूनच लिखाणाची आवड आहे. त्यासाठी तिला 2003 मध्ये राज्य शासनाचा बालश्री पुरस्कारही मिळाला होता. 'दे धमाल' या मालिकेतून ती पहिल्यांदाच टेलिव्हिजनवर झळकली होती. या मालिकेत ती बालकलाकार म्हणून झळकली होती.


रूईया महाविद्यालयात शिक्षण घेत असताना स्पृहाने अनेक एकांकिका स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि त्या गाजवल्या.  त्या काळात स्पृहा ‘ग म भ न’, ‘युग्मक’, ‘अनन्या’ या एकांकिकांमध्ये तिने उत्तम भूमिका साकारल्या शिवाय अनेक पारितोषिकेही पटकावली.

अभिनयात सुरुवात करण्याआधी युपीएससी करून आयएएस बनण्याचं स्पृहाचं स्वप्न होतं. ‘अग्निहोत्र’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’, ‘उंच माझा झोका’ या मालिकेतील तिच्या भूमिका लक्षवेधी ठरल्या. तर ‘मोरया’, ‘मायबाप’, ‘बायोस्कोप’, पे’ईंग घोस्ट’, बाबा या आणि इतर अनेक चित्रपटांमधून स्पृहाने प्रेक्षकांची मनं जिंकली. सूर नवा ध्यास नवा या गाण्याच्या कार्यक्रमातील तिचं सूत्रसंचालनही लक्षवेधी ठरलं. 


 
अनेक नाटक, मालिका, सिनेमांमध्ये झळकणाऱ्या स्पृहाला लिखाणाची आवड असल्याने तिच्या ब्लॉगवरदेखील ती लिहीते. स्पृहाची एक उत्तम कवयित्री म्हणून देखील ओळख आहे. ‘चांदणचुरा’ या तिच्या पहिल्या वहिल्या काव्यसंग्रहासाठी तिला कवी कुसुमाग्रज हा पुरस्कारही मिळाला आहे. ‘लोपामुद्रा’ हा तिचा दुसरा काव्यसंग्रही चांगलाच गाजला.

‘रंगबाज फिर से’ या हिंदी वेबसिरीमधील स्पृहाचं काम लक्षवेधी ठरलं.

याशिवाय ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या ‘अटकन चटकन’ सिनेमातील तिच्या भूमिकेचही कौतुक होत आहे. आता स्पृहा ओटीटी प्लॅटफॉर्मही गाजवताना दिसत आहे.


 

Recommended

PeepingMoon Exclusive