By  
on  

अरुंधतीमधील फरक संवेदनांच्या पातळीवर जाणणाऱ्या या व्यक्तिला मधुराणीने दिल्या खास शुभेच्छा

'आई कुठे काय करते' या मालिकेत आता अरुंधतीचं वेगळं रुप पाहायला मिळतय. एकीकडे अनिरुद्धसाठी सतत धडपडणारी, त्याची सगळी कामं करणारी अरुंधती आता मात्र त्याचं कोणतच काम करत नाही. संजना आणि अनिरुद्धच्या नात्याविषयी कळल्यापासून अरुंधती बदलेली दिसतेय. यात अभिनेत्री मधुराणीच्या अभिनयाचे दोन वेगळे पैलू पाहायला मिळालेत. मात्र या मालिकेच्या यशात टीम वर्क असल्याचं या मालिकेतील कलाकार सतत सांगतात. यात त्यांचे मेकअप आर्टिस्टही सहभागी आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

अरुंधती पर्यंत पोहचण्यासाठीचा प्रवास मला दररोज करावा लागतो...आणि तो बाहेरून आत जाणारा असतो... makeup / गेटअप पूर्ण झाला की मी एकदा आरशात पाहते आणि समोर दिसणाऱ्या अरुंधतीचं बोट पकडून चालायला लागते, ती नेईल तिथे जाते.. . महिन्याभरापूर्वीची अरुंधती आणि आताची अरुंधती ह्यांच्यात , दोन स्वतंत्र व्यक्तीमत्व असावीत इतका फरक आहे... तो फरक संवेदनांच्या पातळीवर जाणणारा मेकअप आर्टिस्ट लाभण हे भाग्यच असतं....! समीर दादा, तुम्ही खरंच आमचे दादा झाला आहात....!!! तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ..!!!

A post shared by Madhurani gokhale Prabhulkar (@madhurani.prabhulkar) on

 

अरुंधतीच्या भूमिकेला, तिच्यातील संवेदनांच्या पातळी जाणणारा मेकअप आर्टिस्ट लाभल्याचं मधुराणी सांगते. त्याच्याच वाढदिवसानिमित्ताने मधुराणीने खास पोस्ट केली आहे. मकेअप आर्टिस्ट समीर हे अरुंधतीच्या भूमिकेसाठी मधुराणीचा मेकअप करतात. त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने मधुराणी लिहीते की, "अरुंधती पर्यंत पोहचण्यासाठीचा प्रवास मला दररोज करावा लागतो...आणि तो बाहेरून आत जाणारा असतो... makeup / गेटअप पूर्ण झाला की मी एकदा आरशात पाहते आणि समोर दिसणाऱ्या अरुंधतीचं बोट पकडून चालायला लागते, ती नेईल तिथे जाते.. .महिन्याभरापूर्वीची अरुंधती आणि आताची अरुंधती ह्यांच्यात , दोन स्वतंत्र व्यक्तीमत्व असावीत इतका फरक आहे... तो फरक संवेदनांच्या पातळीवर जाणणारा मेकअप आर्टिस्ट लाभण हे भाग्यच असतं....! समीर दादा, तुम्ही खरंच आमचे दादा झाला आहात....!!! तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ."

Author

Recommended

PeepingMoon Exclusive