नाईकांच्या वाड्यातील विक्षीप्त आणि भीतीचं काहूर माजवणा-या एकामागोमाग एक घडणा-या घटना तर अण्णांची शेवंतासोबत सुरु असलेली प्रेमलीला, पण इथे मालिकेला आणखी एक रंजक वळण मिळतेय ते अण्णांच्या वाईटावर टपलेली त्यांची चुलती वच्छी. नाईकांच्या वाड्यातून अनेक वर्षापूर्वी वच्छीच्या कुटुंबियांना बेघर करण्यात आलं त्यांची जमीन आणि दागिने अण्णांनी बळकावले. त्यामुळे अण्णा आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल वच्छीच्या मनात राग आणि संतप्त चीड अजूनही धगधगतेय. त्यात एकदा वाड्यावर आपला हक्क मागण्यासाठी आलेल्या वच्छी आणि तिचा मुलगा काशीवर अण्णांनी गोळ्या झाडल्या होत्या.
क्षणोक्षणी अण्णांना दूषणं लावणा-या वच्छीच्या मुलाचं म्हणजे काशीचं लग्न आहे,पण दारिद्रयाने भरलेल्या घरात लग्नकार्यासाठी आणि नव्या सुनेच्या स्वागतासाठी तिच्याकडे काहीच नाहीय. म्हणून ती अण्णांच्या नावे तळतळाट करतेय आणि कहर म्हणजे काशीची वरात ती नाचत नाचत नाईकांच्या वाड्यावर घेऊन आलीय आणि हे आपलं मूळ घर आहे, असं म्हणत नव-याला वाड्याच्या दारात नारळ फोडायला लावतेय. वरातीचा हा सर्व गोंधळ पाहून सर्वच नाईकमंडळी बाहेर येतायत आणि अण्णासुध्दा बाहेर आले आहेत, पण आता ते ही वरात पाहून नेमकं कोणतं पाऊल उचलणार हे जाणून घेण्यासाठी पाहत राहा रात्रीस खेळ चाले, दररोज रात्री 10.30 वा. झी मराठीवर.
https://www.instagram.com/p/BuRb1NRl-gB/