By  
on  

नवविवाहीत जोडपे शर्मिष्ठा आणि तेजसचा हा रोमँटिक व्हिडीओ एकदा पाहाच

अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाई यांचा लग्नसोहळा नुकताच पार पडला आहे. शर्मिष्ठा आणि तेजसच्या लग्नाचे विविध कार्यक्रम गेल्या काही दिवसांपासून पार पडताना दिसले.  केहवण, मेहंदी, हळदी या विविध कार्यक्रमातील खास क्षण शर्मिष्ठाने तिच्या सोशल मिडीया अकाउंटवर पोस्ट केेले. 

 

नुकतच दोघांनी लग्नानंतर पहिल्यांदाच एकत्र एका जाहिरातीसाठी फोटोशूट केलं. यावेळी दोघंही खास पेहरावात दिसले. शर्मिष्टाने निळ्या रंगाची साडी परिधान करून सिल्व्हर ज्वेलरी घातली होती. तर तेजसचही शर्मिष्टाला मॅचिंग असं आउटफीट होतं. 

 

या जाहिराती दरम्यान दोघांनी एकत्र रोमँटिक व्हिडीओही केला आहे. शर्मिष्ठाने हा व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive