अभिनेत्री रश्मी अनपट ही तिच्या मुलाचा दुसरा वाढदिवस साजरा करत आहे. रश्मीचा मुलगा आता दोन वर्षांचा झाला आहे. आणि त्याच्या वाढदिवसानिमित्ताने रश्मीने सोशल मिडीयावर खास पोस्ट केली आहे.
ती या पोस्टमध्ये लिहीते की, "वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या मुला. असं वाटतय की ही कालचीच गोष्ट आहे जेव्हा मी तुला माझ्याजवळ पहिल्यांदा घेतलं होतं. असं म्हणतात वेळ निघून जाते. मी हे अनुभवलं आहे. तू लवकर मोठा होत आहेस आणि आता तर दोन वर्षांचा झाला आहेस. तू जन्माला आल्यापासून मला अनंत आनंद आणि प्रेम दिलं आहेस. तुला आयुष्यभरासाठी आनंद आणि प्रेमाच्या शुभेच्छा देते. तुझ्या मिठी आणि गोड हास्यासाठी धन्यवाद. तू मला जगण्यासाठी जगाचा चांगलं स्थान बनवलं आहेस. खूप खूप प्रेम"
या पोस्टमध्ये रश्मीने मुलासोबतचे फोटोही पोस्ट केले आहेत. दोघांचे हे गोंडस फोटो तिच्या चाहत्यांनाही आवडले आहेत. रश्मी ही अभिनेता अमीत खेडेकरची पत्नि आहे. 2016 मध्ये दोघांनी लगीनगाठ बांधली होती तर 2018मध्ये रश्मीन गोंडस बाळ अभिरला जन्म दिला होता.