अनेकदा मुलं आई-वडिलांनी केलेल्या गोष्टीत करियर करण्यापेक्षा त्यांची वेगळी वाट निवडतात. आता प्रसिद्ध दिग्दर्शक संजय जाधव यांच्या मुलीचच उदाहरण घ्या. एकीकडे संजय जाधव हे मराठी मनोरंजन विश्वात दिग्दर्शक म्हणून काम करत असताना त्यांच्या मुलीला मात्र डान्सची प्रचंड आवड आहे.
धृति असं संजय जाधव यांच्या मुलीचं नाव आहे. धृतिला नृत्याची प्रचंड आवड आहे. विविध वेस्टर्न डान्स फॉर्म ती सहजरित्या करते. सोशल मिडीयावर तर धृतिचे डान्स व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असतात.
धृतिने वडिल संजय जाधव यांच्यासोबतही डान्स व्हिडीओ केला होता. संजय जाधव यांनाही नृत्याची आवड आहे. मात्र धृतिने तिची ही आवड चांगलीच जोपासली आहे. सोशल मिडीयावर डान्सिंग सिम्बा या नावाने धृतिचे अकाउंट असून त्यावर तिचे विविध डान्स व्हिडीओ पाहायला मिळतात. धृतिचे अनेक सोलो आणि ग्रुप डान्स व्हिडीओही पाहायला मिळतात.