पाहा Video : अशी सुरु आहे रिंकू राजगुरुची लंडनवारी

By  
on  

अभिनेत्री रिंकू राजगुरु प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी पुन्हा सज्ज झाली आहे. रिंकू सध्या तिच्या आगामी मराठी सिनेमाचं चित्रीकरण करत आहे. 'छूमंतर' या आगामी मराठी सिनेमात रिंकू झळकणार आहे. या सिनेमात रिंकूसोबत अभिनेत्री प्रार्थना बेहेरेदेखील झळकणार आहे. अभिनेता सुव्रत जोशी देखील या सिनेमात असेल. 

या सिनेमाचं चित्रीकरण सध्या लंडनमध्ये सुरु आहे. म्हणूनच रिंकूची सध्या लंडनवारी सुरु आहे. रिंकू लंडनमध्ये भटकंती करताना दिसत आहे. रिंकूने नुकताच तिचा व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे.या व्हिडीओत रिंकू हटके लुकमध्ये दिसत आहे. या सिनेमात रिंकूचा हाच लुक असेल का असाही प्रश्न सध्या पडलाय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

 

''सैराट'नंतर रिंकू 'कागर', 'मेकअप' या मराठी सिनेमांमध्ये झळकली होती. त्यानंतर रिंकूने ओटीटी प्लॅटफॉर्मवरही एन्ट्री घेतली. 'हंड्रेड' या हिंदी वेबसिरीजमध्ये रिंकू लारा दत्तसोबत झळकली आहे.

Recommended

Loading...
Share