लॉकडाउनच्या काळात प्रसिद्ध कोरिओग्राफर फुलवा खामकर आणि अभिनेत्री उर्मिला कोठारेने सोशल मिडीयावर एक डान्स व्हिडीओ पोस्ट केला होता. हसता हूवा नूरानी चेहरा या गाण्यावर डान्स केला होता. कोरोनाग्रस्त परिस्थितीत दोघींनी आपाआपल्या घरीच तो व्हिडीओ शूट केला होता. मात्र या व्हिडीओला सोशल मिडीयावर प्रचंड प्रसंती मिळाली होती. या डान्स व्हिडीओसाठी दोघींना चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या होत्या. फुलवा आणि उर्मिला दोघीही खास मैत्रिणी असून त्यांना नृत्याची आवड आहे.
याच गाण्यावर दोघी आता पुन्हा थिरकल्या आहेत. 'चला हवा येऊ द्या' या विनोदी कार्यक्रमाच्या खास भागासाठी या दोघींनीही हजेरी लावली होती. यावेळी पुन्हा एकदा या गाण्यावर फुलवा आणि उर्मिला थिरकल्या आहेत. यावेळी या दोघींनी 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर धमाल केली. लवकरच हा एपिसोड टेलिव्हिजनवर प्रदर्शित करण्यात येईल.