By  
on  

डान्सिंग क्वीनच्या मंचावर राधिका, गुरुनाथची डान्स मस्ती

'डान्सिंग क्वीन' या कार्यक्रमाचा मंच लार्ज साईज स्पर्धकांनी विविध परफॉर्मन्सने दणाणून सोडला आहे. 70 किलो वजनापेक्षा जास्त असलेल्या स्पर्धकांचे एकापेक्षा एक परफॉर्मन्स या मंचावर पाहायला मिळतात. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि आर जे मलिष्का या कार्यक्रमाच्या परिक्षक आहेत. तर अद्वैत दादरकर या कार्यक्रमाचं सुत्रसंचालन करतो. मात्र या आठवड्यात या कार्यक्रमाच्या मंचावर चांगलाच कल्ला होणार आहे.

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतील कलाकार या मंचावर हजेरी लावणार आहे. राधिका आणि गुरुनाथ या मंचावर धमाल डान्स मस्ती करताना दिसतील. तेव्हा यंदा या कार्यक्रमात मनोरंजनाचा डबल डोस पाहायला मिळेल. या मंचावर राधिका आणि गुरुनाथ थिरकताना दिसणार आहे. एवढच काय तर या मालिकेत सौमित्रची भूमिका साकारणारा अद्वैत कार्यक्रमाचा भाग असल्याने तोही त्यांच्या या डान्स-मस्ती सहभागी होताना दिसेल. 

तेव्हा या मालिकेतील ही कलाकार मंडळी यंदा डान्सिंग क्वीनच्या मंचावर आणखी काय धमाल करते हे पाहणं रंजक ठरेल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive