By  
on  

प्राजक्ता माळीच्या ग्लॅमरस अदा, या गाण्यावर केला असा व्हिडीओ

अभिनेत्री प्राजक्ता माळीचे इन्स्टाग्राम अकाउंटवर 1 मिलियनपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. प्राजक्ता ही सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. तिचा सोशल मिडीयावर मोठा चाहतावर्गही आहे. प्राजक्ता तिच्या विविध अपडेट्स चाहत्यांसाठी सोशल मिडीयावर शेयर करत असते. नुकतच प्राजक्ताने पोस्ट केलेला व्हिडीओ सध्या लक्षवेधी ठरला आहे. 
या स्लो मोशन व्हिडीओत प्राजक्ताच्या ग्लॅमरस अदा पाहायला मिळतात. करिना कपूरच्या छलिया या गाण्यावर प्राजक्ताचा हा ग्लॅमरस व्हिडीओ आहे. या व्हिडीओत प्राजक्ता स्विमिंग पूलमध्ये हा व्हिडीओ शूट करण्यात आलाय. प्राजक्ताच्या चाहत्यांनाही हा व्हिडीओ प्रचंड आवडला आहे. 

प्राजक्ता तिच्या सोशल मिडीया अकाउंटवर तिचे विविध फोटोशूटही शेयर करत असते. प्राजक्ता ही एक उत्तम अभिनेत्री असून एक उत्तम नृत्यांगनादेखील आहे. सध्या महाराष्ट्रीच हास्यजत्रा या कार्यक्रमात तिचं हटके सुत्रसंचालन पाहायला मिळतं. याशिवाय मस्त महाराष्ट्र या ट्रॅव्हल कार्यक्रमात ती महाराष्ट्रभर भटकंती करताना दिसते.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive