By  
on  

शनाया फेम रसिका सुनीलने गायलं हे इंग्रजी गाणं, पाहा व्हिडीओ

अभिनेत्री रसिका सुनील तिचं विविध टॅलेंट समोर आणताना दिसत आहे. एकीकडे एक उत्तम अभिनेत्री म्हणून रसिकाची ओळख असताना ती उत्तम गायिका, नृत्यांगना, फिटनेस फ्रिक असल्याचंही पाहायला मिळतय. अभिनयात पाऊल ठेवण्याआधीपासूनच रसिकाला गायनाची आवड होती. रसिकाने त्याचं प्रशिक्षणही घेतलं होतं. 

रसिकाने सोशल मिडीयावर नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत रसिका गाणं गाताना दिसत आहे. 'ला ला लँड' या हॉलिवुड सिनेमातील 'सिटी ऑफ स्टार्स हे गाणं रसिका गात आहे. रसिकाने हे गाणं सहज सुंदर पद्धतिने गायलं आहे. रसिकाच्या चाहत्यांनाही हे गाणं प्रचंड आवडलं आहे.  'रसिकाने याआधीही अनेकदा तिचे गाण्याचे व्हिडीओ पोस्ट केले आहेत. 

 

यासह रसिकाला नृत्याची आवड देखील आहे. याआधी रसिकाने तिचा डान्स व्हिडीओही पोस्ट केला होता. परदेशात फिल्ममेकिंगचं शिक्षण घेण्यासाठी रसिका भारतात परतल्यावर तिच्यात फिटनेसची आवडही निर्माण झाली. रसिका आता फिटनेससाठीही वर्कआउट करून स्वत:ला फिट ठेवताना दिसते. तिचे फिट फोटोशुटही तिने नुकतच पोस्ट केलं होतं. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive