बिग बींसह सुमीत राघवन आणि इतर कलाकारांनाही भावला बाप लेकाचा तो व्हायरल व्हिडीओ

By  
on  

सध्या सोशल मिडीयावर कोणतीही गोष्ट नेटकऱ्यांना आवडली की ती व्हायरल होत असते. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत वडिल आणि त्यांचा मुलगा एकत्र गाणं गाताना दिसत आहे. इवलासा हा मुलगा आपले वडिल रियाज करत असताना कसं सुरात गाता येईल या प्रयत्नान दिसतोय. हा गोंडस व्हिडीओ सगळ्यांनाच आवडला आहे.

बिग बी अमिताभ बच्चन यांनीदेखील हा व्हायरल व्हिडीओ त्यांच्या सोशल मिडीयावर शेयर केला आहे. तो मुलगाच माणसाचा पिता असल्याचं बिग बी या पोस्टमध्ये लिहीतात. 

 

बिग बींची ही पोस्ट अभिनेता सुमीत राघवननेही  सोशल मिडीयावर शेयर केली आहे. सुमीत या पोस्टमध्ये लिहीतो की, "वडिल मुलाला 1911 मधील आयकॉनिक नाटक 'संगीत मानापमान' मधील नाट्यपद शिकवत आहेत."

 

याशिवया सुमीतने या मुलाच्या गाण्याची पद्धत आणि त्याचे वडिल यांचे कौतुक केले आहे. सध्या सोशळ मिडीयावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओच विविध स्तरावर कौतुक होताना दिसत आहे.

Recommended

Loading...
Share