कॉमेडी अवॉर्ड्समध्ये 'चोरीचा मामला'ची बाजी, जिंकले इतके अवॉर्ड्स

By  
on  

याच वर्षी आलेल्या चोरीचा मामला या प्रियदर्शन जाधव दिग्दर्शित सिनेमाने प्रेक्षकांना खळखळून हसवलं. लॉकडाउनच्या काळातही छोट्या पडद्यावर हा सिनेमा जेव्हा केव्हा लागला तेव्हा प्रेक्षकांनी आवर्जुन पाहिला. आता या सिनेमावर अवॉर्ड्सचा वर्षाव होताना दिसत आहे. झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्समध्ये या सिनेमाने बाजी मारली आहे.

 

कॉमेडी अवॉर्ड्समध्ये या सिनेमाला तब्बल पाच कॅटेगरीसाठी अवॉर्ड्स घोषीत करण्यात आले आहेत.. या सिनेमाला सर्वोत्कृष्ट सिनेमा, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठी प्रियदर्शन जाधव, या सिनेमातील अभिनेता जितेंद्र जोशीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा, या सिनेमातील अभिनेत्री अमृता खानविलकरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा तर अभिनेत्री किर्ती पेंढारकरला सर्वोत्कृष्ट सहकलाकाराचा पुरस्कार घोषीत झाला आहे. 

या सिनेमात अभिनेता जितेंद जोशी, क्षिती जोग, हेमंत ढोमे, अमृता खानविलकर, अनिकेत विश्वासराव, किर्ती पेढांरकर हे कलाकार झळकले होते.

सोशल मिडीयावरही या सिनेमातील कलाकारांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.एकूणच प्रेक्षकांची मनं जिंकलेल्या या सिनेमावर आता पुरस्कारांचा वर्षाव होताना दिसतोय.

Recommended

Loading...
Share