कोरिओग्राफर फुलवा आणि अभिनेत्री उर्मिलाचा गरबा डान्स, दोघींनी केला नवा व्हिडीओ

By  
on  

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने प्रसिद्ध कोरिओग्राफर फुलवा खामकर आणि अभिनेत्री उर्मिला कोठारे या मैत्रिणींच्या जोडीने खास व्हिडीओ तयार केला आहे. सध्या कोरोनाग्रस्त परिस्थिती घराबाहेर जाऊन गरबा खेळला जात नसल्याने घरातच अनेक जण गरब्याचा आनंद लुटत आहेत.

 

फुलवा आणि उर्मिलानेही असचा खास गरब्याच्या गाण्यावर डान्स व्हिडीओ केला आहे. नुकताच फुलवाने या डान्स व्हिडीओच्या रिहर्सलचा व्हिडीओ पोस्ट केला होता. आणि आता नव्या व्हिडीओच्या निमित्ताने खास गरबा लुकमधील फोटोही पोस्ट केले आहेत. 

 

फुलवा आणि उर्मिलाचे एकत्र डान्स व्हिडीओ कायमच लक्षवेधी ठरले आहेत. तेव्हा हा व्हिडीओही लक्षवेधी ठरत आहे. 

Recommended

Loading...
Share