By  
on  

अभिनेत्री शर्मिला राजाराम देत आहे ही ब्रेकिंग न्यूज, दिसली या भूमिकेत

 अभिनेत्री शर्मिला राजाराम शिंदे आता एका हटके भूमिकेत पाहायला मिळणार आहे. 'नो ब्रेकिंग न्यूज' या वेब मालिकेसाठी शर्मिता हटके वृत्तनिवेदिका बनली आहे. व्हायरस मराठी या युट्यूब चॅनेलवर ही मालिका पाहायला मिळेल. 

बातम्या देण्याची ह्युमरस पद्धत यात पाहायला मिळणार आहे. यात बातम्या देताना तांदूळ निवडण्याचे काम शर्मिला दिसत आहे. सध्या शर्मिलाचा हा अंदाज सोशल मिडीयावर चर्चेत आहे. वृत्तवाहिन्यांमध्ये ज्या पद्धतिने बातम्या दिल्या जातात त्या पद्धतीला  विनोदी अंगाने सादर करण्याचा यात प्रयत्न केलेला आहे. निवेदनाच्या आणि सादरीकरणाच्या या अनोख्या शैलीमुळे ही मालिका लक्षवेधी ठरत आहे.

आत्तापर्यंत याचे 2 भाग प्रदर्शित झाले असून तिसरा भागही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. लॉकडाऊनच्या काळात अनेक जण वर्क फ्रॉम होम करत असून, जर वृत्तनिवेदक वर्क फ्रॉम होम करू लागले तर ते कशाप्रकारे बातम्या देतील, हे या शो मध्ये विनोदी पद्धतीने दाखवले गेले आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive