By  
on  

बिग बी अमिताभ बच्चन यांनी लावला 'डोक्याला शॉट' लावला

सध्या सर्वत्र 'डोक्याला शॉट' या मराठी सिनेमाचा जबरदस्त बोलबाला सुरु आहे. फक्त मराठीच नाही तर बॉलिवूडमध्येसुध्दा या सिनेमाची चर्चा सुरु आहे. बॉलिवूडकरांचं मराठी प्रेम कधीच लपून राहिलेलं नाही. सलमान खान, प्रियांका चोप्रा, अक्षय कुमार ही बडी नावं आजपर्यंत मराठीसोबत कधी निर्मिती तर कधी पाहुणे कलाकार म्हणून जोडली गेली होती. पण आता महानायक अमिताभ बच्चन यांनी एका मराठी सिनेमासाठी आपल्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. शिवकुमार पार्थसारथी दिग्दर्शित 'डोक्याला शॉट' या सिनेमाला व्हिडीओद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.

 

https://www.instagram.com/p/BubbmwpghAa/

'डोक्याला शॉट' सिनेमात प्राजक्ता माळी, सुव्रत जोशी रोहित हळदीकर हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. मराठी आणि तामिळ या दोन भिन्न संस्कृतीचा आगळावेगळा मिलाप अतिशय सुंदर आणि धमाल विनोदी पद्धतीने या चित्रपटात दाखवण्यात आला आहे.  बॉलिवूड कलाकारांना देखील भुरळ घालणारा हा 'डोक्याला शॉट' चित्रपट १ मार्चला सर्वत्र प्रदर्शित होत आहे. शिवकुमार पार्थसारथी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. उत्तुंग हितेंद्र ठाकूर आणि  'अ व्हिवा इनएन प्रॉडक्शन' यांनी या अफलातून चित्रपटाची निर्मिती केली आहे.

https://youtu.be/IxVF4Au6a78

Recommended

PeepingMoon Exclusive