या अभिनेत्रीने केला चक्क रीमा लागू यांचा लुक, फोटो पाहून विश्वास नाही बसणार

By  
on  

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या विनोदी कार्यक्रमातील विनोदवीर प्रेक्षकांना खळखळून हसवतात. या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकार त्यांच्या वेगळ्या शैलीने मनोरंजन करतात. यातच अभिनेत्री नम्रता संभेराव तिच्या विविध कॅरेक्टर्सनी हसवते. नम्रताचे विनोदाचे उत्तम टायमिंग शिवाय विविध पात्रे ती हुबेहुब सादर करते. नम्रताचे लॉली हे कॅरेक्टर तर प्रचंड लोकप्रिय आहे.

सोशल मिडीयावरही नम्रता अधूनमधून विविध पोस्ट करत असते. नम्रताने नुकताच एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत ती वेगळ्या लुकमध्ये दिसतेय. हा लुक आहे प्रसिद्ध अभिनेत्री रीमा लागू यांचा. रीमा लागू यांचा हा लुक नम्रताने केलेला पाहायला मिळतोय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

नयन भडभडे (रीमा लागू) यांचा जन्म २१ जून १९५८ रोजी मुंबईतील गिरगावात झाला. या मराठी व हिंदी चित्रपट आणि नाट्य अभिनेत्री होत्या. सुमारे चार दशकांचा मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील अनुभव असलेल्या रीमाने अनेक हिंदी चित्रपटांमधून अभिनेत्री म्हणून काम केले. त्यानी बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानी जाहिरातींमधून अभिनय क्षेत्राशी पहिली ओळख करून घेतली. त्यानी नाटकामध्ये पुरुष व्यक्तिरेखा देखील साकारल्या.. ‘नटसम्राट’ नाटकातील अप्पासाहेब बेलवलकर ही व्यक्तिरेखा साकारली होती. त्या लग्ना नंतर नयन भडभडेच्या रीमा लागू झाल्या. मराठी रंगभूमी सोबतच नंतर मराठी, हिंदी, गुजराथी तसेच कन्नड आणि भोजपुरी चित्रपटांत त्यांनी विविध भूमिका साकारल्या. कयामत से कयामत तक, मैंने प्यार किया, साजन, हम साथ साथ हैं, जुडवा वास्तव, कुछ कुछ होता है अशा अनेक चित्रपटांमधून त्यानी आई ची भूमिका प्रेक्षकांसमोर आणली. त्यांची तू तू मै मै ही विनोदी मालिका प्रेक्षकाना आजही आवडते. आयुष्यातला बराच काळ त्यानी मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीवर अधिराज्य गाजवले. and Hair :@tanvisalonnspa Photographer : @omkar_photography_thane Management and concept :@maomi_creations_suchitra_event In frame : Namrata Yogesh Sambherao Content writer : @renuka1702

A post shared by Namrata awate Sambherao (@namrata_rudraaj) on

 

मात्र या लुकमध्ये नम्रात नेमकं काय करणार आहे हे अद्याप गुलदस्त्यात आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या मंचावर नम्रता आजवर विविध लुकमध्ये, विविध रुपात दिसली आहे. मात्र नम्रताच्या रीमा लागू यांच्या रुपातील लुकने सगळ्यांचच लक्ष वेधलं आहे. तेव्हा नम्रताचं हे रीमा लागू यांना ट्रीब्यूट लुक नेमकं कशासाठी आहे याकडेच लक्ष लागून राहिलय. 

या पोस्टमध्ये नम्रताने रीमा लागू यांच्याविषयीची माहितीही जोडली आहे. शिवाय त्यांचं खरं नाव नयन भडभडे याचाही उल्लेख पोस्टमध्ये केलाय.

Recommended

Loading...
Share