By  
on  

विक्रम फडणीसच्या ‘स्माईल प्लीज’चा मुहुर्त हृतिक रोशनच्या उपस्थित दिमाखात संपन्न

बॉलिवूडमध्ये फॅशन डिझायनर अशी ओळख असलेले, मराठी तसेच हिंदी सिनेमांचे निर्माता, दिग्दर्शक विक्रम फडणीस यांच्या आगामी ‘स्माईल प्लीज’ सिनेमाचा मुहुर्त नुकताच संपन्न झाला आहे. या सिनेमाच्या मुहुर्ताला बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीच्या कलाकारांनी उपस्थिती लावली. विशेष उपस्थिती दिसली ती अभिनेता हृतिक रोशनची.

‘स्माईल प्लीज’ हा विक्रम यांचा दुसरा मराठी सिनेमा आहे. त्यापूर्वी त्यांनी ‘हृदयांतर’ या सिनेमाच्या निर्मिती आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती. या सोहळ्याला हृतिक सोबतच अमीषा पटेल, कियारा अडवाणी, श्वेता बच्चन, मनीष पॉल, मुक्ता बर्वे, प्रसाद ओक, आदिती गोवित्रीकर, ललित प्रभाकर हे कलाकार उपस्थित होते.

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive