2021 मध्ये पाहायला मिळणार 'Colorफूल'ची रंगीत जादू

By  
on  

कोरोनाग्रस्त परिस्थितीत अनलॉकनंतर आता चित्रपटसृष्टीही हळूहळू पूर्ववत होऊ लागली आहे. चित्रीकरणाला सुरुवात झाल्यानंतर आता विविध सिनेमाची ट्रीट प्रेक्षकांना मिळणार आहे. यंत्रा पिक्चर्स प्रकाशित प्रकाश कुंटे दिग्दर्शित 'colorफूल' हा सिनेमा देखील प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

प्रकाश कुंटे यांनी याआधी कॉफी आणि बरंच काही, & जरा हटके, हंपी, सायकल या सिनेमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. शिवाय वेगवेगळे विषय हाताळण्याचाही प्रयत्न केला आहे. तेव्हा या आगामी सिनेमात ते काय नंव घेऊन येतील याची उत्सुकता कायम आहे. नुकताच या सिनेमाचा फर्स्ट लुक पोस्टर आणि मोशन पोस्टर प्रदर्शित झाला आहे. 


          
  या सिनेमाची निर्माती मानसी करणार असून या आधी अनेक हिंदी डोक्यूमेंटरी, लघु चित्रपट निर्मितीची जबाबदारी तिने पार पाडली आहे. प्रयोगशील कलाकृतीची निर्माती म्हणून मानसीची ओळख आहे. हिंदी निर्माती असली तर या सिनेमाच्या निमित्ताने ती पहिल्यांदाच मराठी सिनेमाची निर्मिती करत आहे. 'colorफूल' हा सिनेमा पुढील वर्षी म्हणजेच 2021मध्ये रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. पोस्टमध्ये दिसणारी जोडी आणि त्या भूमिका कोण साकारणार हे अद्याप समोर आलेलं नाही.

Recommended

Loading...
Share