By  
on  

पाहा Video : अशा सुंदर लुकमध्ये दिसली टेलिव्हिजनवरील ही लोकप्रिय अभिनेत्री

'स्वराज्यरक्षक संभाजी' आणि त्यानंतर आता 'आई माझी काळूबाई' या दोन्ही मालिकांमधून अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड लक्षवेधी ठरली. सध्या 'आई माझी काळूबाई' या मालिकेत प्राजक्ता एका तरुण मुलीचं पात्र साकारतेय. तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना, विविध गोष्टी या तिला आता काळूबाईची काहीतरी संबंधीत जाणवू लागतात. मात्र आता या मालिकेत पुढे काय घडतय हे पाहणं रंजक ठरतय.

प्राजक्ता ही टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक बनली आहे. सोशल मिडीयावरही तिचा मोठा चाहतावर्ग आहे. नुकतच प्राजक्ताने सोशल मिडीयावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. एका जाहिरातीच्या फोटोशूटसाठी प्राजक्ता नटून थटून तयार झालेली दिसतेय. 

 

प्राजक्ताच्या या व्हिडीओला चाहत्यांची देखील चांगली पसंती मिळाली आहे. या लुकमध्ये प्राजक्ताने साडी नेसली असून भरजरीत दागिन्यांनी ती नटून ती अतिशय सुंदर दिसतेय.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive