By  
on  

घरकाम करणाऱ्या बाईंच्या विश्वाचा वेध घेणारी मालिका ‘मोलकरीण बाई’ स्टार प्रवाहवर

घरात जर एक दिवस काम करणारी बाई नाही आली तर...या दिवसाची कित्येकजण कल्पनाच करु शकत नाही. आपलं संपूर्ण घर ज्यांच्यावर अवलंबून असतं त्या काम करणा-या मोलकरीण बाई जरी आपल्या घरातल्या नसल्या तरी नकळतच घराचा अविभाज्य घटक बनून जातात. अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजांसोबतच घरकाम करणारी बाई ही नोकरदार स्त्रियांच्या आयुष्यातली महत्त्वाची व्यक्ती आहे. त्या असतात म्हणून घरची सर्व धुरा त्यांच्या हाती सोपवून आपण निश्चिंत होऊन ऑफीसची आणि बाहेरची कसरत करतो.

कधी ताई, कधी मावशी, कधी काकू तर कधी फक्त बाई बनून या घरकाम करणा-या स्त्रिया आजच्या प्रत्येक कुटुंबाचा आधार बनतात. आपल्या आयुष्यातल्या याच महत्त्वाच्या व्यक्तीची गोष्ट सांगणारी ‘मोलकरीण बाई’ ही मालिका लवकरच ‘स्टार प्रवाह’ या वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. १८ मार्चपासून सायंकाळी ६.३० वाजता ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

https://twitter.com/StarPravah/status/1101361255070212097

घरकाम करणाऱ्या बाईंचं त्यांच्या मालकीणींसोबत असणारं हृदयस्पर्शी नातं या मालिकेतून उलगडण्यात येणार आहे. ही गोष्ट आहे अश्या स्त्रियांची ज्यांचं आयुष्य संघर्ष आणि व्यथांनी भरलेलं असलं तरी जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा अनमोल संदेश त्या देतात. आपल्या आयुष्यात घडणारे अनेक छोटे मोठे प्रसंग ही मालिका पाहताना प्रेक्षकांना आठवतील. उषा नाडकर्णी, भार्गवी चिरमुले, सारिका निलाटकर, सुप्रिया पाठारे, अश्विनी कासार आणि गायत्री सोहम या अभिनेत्रींना या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळेल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive