By  
on  

धनश्रीकडून नव्या नंदिता वहिनींना खास शुभेच्छा, पोस्ट केला हा व्हिडीओ

नंदिता वहिनी म्हणजेच वहिनीसाहेबांच्या भूमिकेत अभिनेत्री धनश्री काडगांवकरने आत्तापर्यंत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. मात्र 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत आता वहिनीसाहेब परतल्या आहेत. वहिनीसाहेबांची मालिकेत पुन्हा एन्ट्री झाली आहे. आणि आता धनश्रीच्या जागी अभिनेत्री माधुरी पवार ही भूमिका साकारतेय. धनश्री आता प्रेग्नेंट असल्याने ती ही मालिका करू शकत नसली तरी मालिकेसाठी आणि या भूमिकेसाठी तिने खास शुभेच्छा दिल्या आहेत.

धनश्रीने सोशल मिडीयावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत ती या भूमिकेचा प्रवास सांगतेय. ती म्हणते की, "गेले तीन वर्षे मी नंदिता हे कॅरेक्टर करत होती. मला खूप मजा आली आणि प्रेक्षकांचं प्रेमही मिळालं. मात्र आता माझ्या आयुष्यात अशी फेज आली आहे ज्यामुळे मी हे कॅरेक्टर करू शकत नाही. माझ्याऐवजी अभिनेत्री माधुरी पवार हे कॅरेक्टर करतेय.जसं मला तुम्ही प्रेम दिलं  तसचं प्रेम तिच्याही पाठीशी राहु देत. आणि या मालिकेवर असचं प्रेम करत राहा."

 

तेव्हा धनश्री जरी ही भूमिका आता करत नसली तरी नंदिता वहिनीची भूमिका आता साकारत असलेल्या माधुरी पवारसाठी तिने खास शुभेच्छा दिल्याचं पाहायला मिळतय. 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेत आता वहिनीसाहेबांची एन्ट्री झाली आहे. या भूमिकेसाठी धनश्री जशी लोकप्रिय ठरली तसं माधुरीला देखील या भूमिकेसाठी यश मिळतय का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Recommended

PeepingMoon Exclusive