By  
on  

'सैराट' फेम रिंकू राजगुरु म्हणते, "मी परफेक्ट नाही"

अभिनेत्री रिंकू राजगुरु विविध भूमिकांमधून स्वत:ची एक वेगळी ओळख बनवताना दिसतेय. सैराट या ब्लॉकबस्टर सिनेमानंतर सैराट फेम रिंकू अशी ओळख असताना रिंकूने विविध भूमिका साकारून ती एक उत्तम अभिनेत्री असल्याचं सिद्ध केलं. 'कागर', 'मेकअप' या सिनेमांमधून तर 'हंड्रेड' या हिंदी वेबसिरीजमधून रिंकूने या क्षेत्रात स्वत:चं एक वेगळं स्थान मिळवलय.

रिंकू आता सोशल मिडीयावरही मोठ्या प्रमाणात सक्रिय झाली आहे. सोशल मिडीयावर तिचे फोटो आणि व्हिडीओ पाहायला मिळतात. रिंकूने नुकताच एक फोटो पोस्ट केला आहे. मात्र या पोस्टमधील कॅप्शन सध्या लक्षवेधी ठरतय. या पोस्टमध्ये रिंकू लिहीते की, "मी परिपूर्ण नाही मी ओरिजिनल आहे"

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

I'm not perfect I'm original.

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

 

रिंकू सध्या भारताबाहेर तिच्या आगामी सिनेमाचं चित्रीकरण करत आहे. 'छूमंतर' या हिंदी आणि मराठी दोन्ही भाषेतील सिनेमात रिंकू झळकणार आहे. सध्या लंडनमध्ये या सिनेमाचं चित्रीकरण सुरु आहे. या सिनेमात रिंकूसोबत अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि सुव्रत जोशी हे कलाकार आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive