'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतील गौरीविषयी ही गोष्ट माहिती आहे का ?

By  
on  

'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका आता लोकप्रिय ठरतेय. गौरी आणि जयदीपची जोडी या मालिकेत सगळ्यांचं लक्ष वेधतेय. अभिनेत्री गिरीजा प्रभू या मालिकेत गौरीची भूमिका साकारत आहे. मालिकेतील तिचं पात्र अतिशय साधंभोळं आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Girija Girish prabhu (@girijaprabhu_official) on

 

गिरीजा ही खऱ्या आयुष्यात मात्र एक उत्तम नृत्यांगना आहे. गिरीजाला नृत्याची आवड आहे. म्हणूनच डान्सिंग क्विन या डान्स रिएलिटी शोमध्येही गिरीजा स्पर्धक म्हणून दिसली होती. या कार्यक्रमात तिने तिच्या नृत्य कौशल्याने सगळ्यांची मनं जिंकली होती. या कार्यक्रमाच्या मंचावर गिरीजाने एकापेक्षा एक बहारदार परफॉर्मन्स सादर केले होते. या कार्यक्रमात परिक्षक बनलेले अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि मयुर वैद्यनेही गिरीजाचं अनेकदा कौतुक केलं होतं. गिरीजाने याआधी अनेक ब्युटी क्विन स्पर्धांमध्येही भाग घेतला होता.

 

'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेत गिरीजा साकारत असलेलं गौरीचं पात्रही आता लक्षवेधी ठरताना दिसतय. मालिकेत सध्या गौरी आणि जयदीपचं लग्न झालय. आता या मालिकेला पुढे काय वळणं मिळतय हे पाहणं औत्सुक्याचं असेल.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#Gauri #SukhMhanjeNakkiKayAsta #StarPravah#kotharevisioin [email protected]

A post shared by Girija Girish prabhu (@girijaprabhu_official) on

 

Recommended

Loading...
Share