रोटी डे हा दरवर्षी 1 मार्चला साजरा केला जातो. गरजू लोकांचा भूक हा मुलभूत हक्कासांठी पुढाकार घेणा-या या ‘रोटी डे’ सामाजिक उपक्रमासाठी मराठी सिनेसृष्टीतील तब्बल 38 हून अधिक कलाकारांनी एकत्र येऊन एक गाणं प्रदर्शित केलं आहे. हा उपक्रम मागील चार वर्षांपासून अभिनेता अमित कल्याणकरच्या पुढाकाराने राबविण्यात येत आहे. ‘रोटी डे’ ही कुठलीही सामाजिक संस्था नसून, एक माणुसकीची चळवळ आहे.
नचिकेत जोग लिखित ओंकार केळकर यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला सुरेश वाडकर, वैशाली सामंत, पं. संजीव अभ्यंकर, सावनी रवींद्र, ज्ञानेश्वर मेश्राम, ऋषिकेश रानडे, डॉ. सलील कुलकर्णी, संदीप खरे, क्रीशा चिटणीस, ओंकार केळकर, आर्या आंबेकर यांचा सुरेल आवाज लाभला आहे. तर अभिनेते विक्रम गोखले, मोहन जोशी, दिलीप प्रभावळकर, मकरंद अनासपुरे, प्रवीण तरडे, प्राजक्ता माळी, संस्कृती बालगुडे, नुपूर दैठणकर, विजू माने, मेघराज राजेभोसले, सुरेश विश्वकर्मा, रमेश परदेशी, नयन जाधव, सुनील गोडबोले, देविका दफ्तरदार, सिद्धेशर झाडबुके, सौरभ गोखले, किरण यज्ञोपवित, मिलिंद शिंत्रे, बिग एम जे संग्राम, श्रीकांत यादव, विजय पटवर्धन, मालविका गायकवाड, विनोद सातव, विनोद खेडकर, देवेंद्र गायकवाड, योगेश जाधव आदी ३८ कलाकार या विशेष गाण्यात दिसणार आहेत. हे गाणे डॉ. रमेश खाडे यांच्या चार्ली स्टुडीओत शूट झाले असून मयूर जोशी कॅमेरामन आहेत. तर शिवरंजनी स्टुडीओ मध्ये गाण्याचे ध्वनिमुद्रण झाले आहे.
https://youtu.be/-dPHvJ2BqmQ