By  
on  

टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच पाहता येणार बिग बींचा हा मराठी सिनेमा

'एबी आणि सिडी' या मराठी सिनेमाच्या निमित्ताने बिग बी अमिताभ बच्चन मराठी सिनेमात झळकले. या सिनेमात विक्रम गोखले यांची महत्त्वाची भूमिका आहे. शिवाय बिग बी यांचा खास गेस्ट अपिअरन्स आहे. बिग बींनी या सिनेमात स्वत: म्हणजेच अमिताभ बच्चन बनूनच काम केलं आहे. बिग बींचा या सिनेमात छोटासा रोल जरी असला तरी तो या सिनेमाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे.

लवकरच या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन पाहायला मिळणार आहे. तेव्हा प्रेक्षकांना पहिल्यांदाच हा सिनेमा टेलिव्हिजनवर पाहता येईल. येत्या 8 नोव्हेंबरला सोनी मराठी वाहिनीवर हा सिनेमा पाहता येणार आहे.  मिलिंद लेले दिग्दर्शित या सिनेमात विक्रम गोखले यांच्यासोबतच सायली संजीव, अक्षय टांकसाळे, सुबोध भावे, नीना कुळकर्णी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका या सिनेमात आहेत.

 

या सिनेमाच्या निमित्ताने बिग बी अमिताभ बच्चन आणि विक्रम गोखले हे दिग्ग्ज कलाकार बऱ्याच वर्षांनी एकत्र स्क्रिन शेयर करताना दिसतात.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive