By  
on  

या दिवशी सई लोकूर अडकणार विवाहबंधनात, फियान्से तिर्थदीपसोबत बांधणार लगीनगाठ

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सई लोकूरने एका व्यक्तिसोबतचा पाठमोरा फोटो पोस्ट केला आणि त्यानंतर ही व्यक्ति कोण अशी चर्चा सुरु झाली. त्यानंतर सईने थेट या व्यक्तिसोबतच्या साखरपुड्याचे फोटो पोस्ट करून तिच्या आयुष्यातील या खास व्यक्तिची ओळख करून दिली. ही व्यक्ति म्हणजे सईचा फियान्से तिर्थदीप रॉय.

सईने सोशल मिडीयावर त्यांच्या साखरपुड्याचे फोटो पोस्ट केले. 

सई आणि तिर्थदीपचे आणखी काही फोटो सोशल मिडीयावर सईने शेयर केले आहेत. मात्र सईने नुकतीच केलेली पोस्ट चांगलीच लक्षवेधी ठरतेय. कारण या पोस्टमध्ये सईने तिच्या लग्नाचा उल्लेख केला आहे. लवकरच म्हणजे एका महिन्यानंतर सई आणि तिर्थदीप लग्नबंधनात अडकणार असल्याचं ती या पोस्टमध्ये सांगतेय.

 

सई या पोस्टमध्ये लिहीते की, ं"एक महिना बाकी आहे. तिर्थदीप मी वाट नाही पाहू शकते तुझ्यासोबत लग्नबंधनात अडकण्यासाठी आणि तुझी पत्नि बनण्यासाठी."

तेव्हा सईच्या साखरपुड्याप्रमाणे त्यांचं लग्नही चर्चेत राहिल यात शंका नाही. या मेड फॉर इच अदर जोडीला पिपींगमून मराठी कडून शुभेच्छा

 

Recommended

PeepingMoon Exclusive