गायिका अर्पिता चक्रवर्तीच्या आवाजात ऐका ती अ‍ॅण्ड ती सिनेमातील हे हळूवार गाणं

By  
on  

रागिनी एमएमएस 2, सत्याग्रह, हीरो आणि इतर चित्रपटांमधील गाण्यांसाठी प्रसिद्ध असलेली गायिका अर्पिता चक्रवर्ती यांना दिग्दर्शक मृणाल कुलकर्णी यांच्या 'ती अ‍ॅण्ड ती' या सिनेमातील 'घे जगूनी तू' या गिताला मिळालेल्या प्रतिसादांबद्दल अत्यंत आनंद झाला आहे. या सिनेमात पुष्कर जोग, सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहेरे यांची भूमिका आहे.

"संगीत ही मानवजातीची सार्वभौम भाषा आहे. 'घे जगूनी तू' हे गाणं खरोखरच ही जाणीव दृढ करत आहे कारण ते प्रेमाची भाषा बोलते आणि जीवनाच्या सुंदर भावनेची अनुभूती करून देतं. असं अर्पिता यांनी एका वक्तव्यात म्हटले आहे.

तिच्या अलीकडील गाणे ‘पैसा ये पैसा’ ट्रेंडिंग आहे आणि २१.९ मिलियन पेक्षा जास्त व्हियूज मिळाले आहेत. बॉलिवूडची राणी माधुरीसाठी गाणं गायचं हे अर्पिताचं स्वप्नं होतं. 18 वर्षांनंतर अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांच्या सुपरहिट जोडीसाठी गाणं म्हणणं यापेक्षा सुंदर गोष्ट काय असू शकते असंही तिला वाटतं. तिच्या आगामी मराठी गाण्याला 'ओल्या ओल्या' या गाण्याला भावनात्मक सूफी ट्रॅक आहे. अर्पिताने आतापर्यंत १५ भाषांमध्ये गाणी गयिली आहेत.

https://www.youtube.com/watch?v=pw6C5Obs7Sk

Recommended

Share