By  
on  

'समांतर - 2'च्या चित्रीकरणाला सुरुवात, लवकरच सिरीज येणार भेटीला

अभिनेता स्वप्निल जोशीने 'समांतर' या वेबसिरीजमधून वेब सिरीज प्लॅटफॉर्ममध्ये डेब्यु केला होता. त्याच्या या डेब्युला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. वि. वा. शिरवाडकर यांच्या समांतर या कादंबरीवर आधारित ही वेब सिरीज आहे. दिग्दर्शक सतिश राजवाडे यांनी या वेब मालिकेच्या पहिल्या सिझनचं दिग्दर्शक केलं होतं. आणि आता या प्रसिद्ध सिरीजचं दुसरं सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतच या सिरीजच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. 

या सिरीजच्या पहिल्या सिझनमध्ये अभिनेता स्वप्निल जोशी मुख्य भूमिकेत असून अभिनेत्री तेजस्विनी पंडित, नितीश भारद्वाज हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसले. या सिरीजच्या निमित्ताने छोट्या पडद्यावर कृष्णाची भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेले स्वप्निल जोशी आणि नितीश भारद्वाज हे कलाकार एकत्र पाहायला मिळाले. सुदर्शन चक्रपाणीच्या शोधात असलेला कुमार महाजन आणि त्याला भेटल्यानंतर कुमार महाजनच्या आयुष्यात काय घडतं हे पहिल्या सिजनमध्ये पाहायला मिळालं होतं. मात्र आता दुसऱ्या सिझनमध्ये ही कथा पुढे जाताना दिसणार आहे. या नव्या सिरीजमध्ये स्वप्निल जोशी आणि इतर पात्रांसोबत आणखी कोणती नवी पात्र पाहायला मिळतील हे देखील औत्सुक्याचं ठरेल. 

या सिरीजच्या दुसऱ्या सिझनचं दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक समीर विद्वांस करत आहेत. तेव्हा दुसऱ्या सिझनमध्ये ते वेगळेपणही पाहायला मिळेल.

 'समांतर 2' च्या चित्रीकरणाची सुरुवात झाल्यानंतर आता ही सिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. लॉकडाउनच्या काळात पहिलं सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. आणि पहिल्याच सिझनला प्रेक्षकांचा भरगोस प्रतिसाद मिळाला होता. आता दुसरं सिझनही प्रेक्षकांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरतय का हे सिरीज प्रदर्शित झाल्यावर समोर येईलच.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive