By  
on  

या ब्लॅक एन्ड व्हाईट फोटोतल्या अभिनेत्रीला ओळखलत का ? आहे प्रसिद्ध मराठी अभिनेत्री

अभिनेत्री रिंकू राजगुरु सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. विशेष म्हणजे सोशल मिडीयावर तिच्या पोस्ट या चर्चेत असतात. रिंकू तिच्या विविध लुकचे फोटो, तिच्या सेटवरील फोटो सोशल मिडीयावर पोस्ट करत असते. मात्र रिंकूने नुकताच पोस्ट केलेला फोटो चांगलाच चर्चेत आला आहे.

रिंकूने एक ब्लॅक एन्ड व्हाईट फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत रिंकूला ओळखणही कठिण जात आहे. या फोटोत रिंकूने मराठमोळा साज केला आहे. रिंकूचा साडी नेसलेला, नथ आणि बिंदी लावलेला हा फोटो आहे. रिंकूच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव झाला आहे. या फोटोत रिंकूचा लुक हा जुन्या काळातील असल्याचा देखील भास होत आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

black and white #favourite #sareelove.

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

 

लवकरच रिंकू ही 'छूमंतर' या द्विभाषिक सिनेमात झळकणार आहे. रिंकू ही नुकतीच या सिनेमाच्या चित्रीकरणासाठी लंडनवारी करून आली आहे. या सिनेमात रिंकू सोबतच प्रार्थना बेहेरे, सुव्रत जोशी, ऋषि सक्सेना, बालकलाकार श्रीनिवास पोकळे हे कलाकार झळकणार आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive