By  
on  

शनाया अर्थात रसिका सुनील पायलट झाली का? विमान चालवतानाचा फोटो शेअर

आजही शनाया म्हटलं की जिचं नाव डोळ्यासमोर येतं ती अभिनेत्री म्हणजे रसिका सुनील. माझ्या नव-याची बायको या मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली आहे. रसिकाने अमेरिकेला जाण्यासाठी माझ्या नव-याची बायको या मालिकेला रामराम ठोकला होता. पण रसिका फॅन्सपासून लांब मात्र अजिबात लांब नाही. रसिका सोशल मिडियावर बरीच अ‍ॅक्टीव्ह असते. आताही तिने विमान चालवतानाचा व्हिडिओ फॅन्ससोबत शेअर केला आहे. यावरून रसिकाचे फॅन्स मात्र चांगलेच बुचकळ्यात पडले आहेत. ‘तुम्हाला फोटोमध्ये जे चित्र दिसतंय तेच खरं आहे. होय, मी विमान उडवतेय.’ या कॅप्शनसहित रसिकानी हा फोटो शेअर केला आहे. पुढे ती म्हणते इतक्या वरून जगाकडे पाहताना आपण किती सुंदर जगात राहतो. याची जाणीव होते असंही रसिकाने लिहिलं आहे

https://www.instagram.com/p/Buik_2IFDFh/?utm_source=ig_web_copy_link

Recommended

PeepingMoon Exclusive