By  
on  

पाहा Photos : हिरवा चुडा, नथ आणि साडीतल्या लुकमध्ये रिंकू राजगुरु दिसली इतकी सुंदर

अभिनेत्री रिंकू राजगुरु ही विविध पेहरावातील, लुकमधील फोटो सोशल मिडीयावर पोस्ट करते. रिंकू जितकी वेस्टर्न लुकमध्ये सुंदर दिसते तितकीच ती मराठमोळ्या लुकमध्येही सगळ्यांचं लक्ष वेधते. याचीच प्रचिती तिने नुकत्याच सोशल मिडीयावर पोस्ट केलेल्या फोटोमधूल आली.

रिंकूने सोशल मिडीयावर मराठमोळ्या लुकमधील सुंदर फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये रिंकूने हातात हिरवा चुडा घातलेला दिसतोय. याशिवाय नाकात नथ, मंगळसूत्र, बिंदी आणि साडी असलेला हा रिंकूचा लुक आहे. रिंकूचा हा लुक पाहुन हा तिच्या आगामी सिनेमासाठीचा लुक तर नाही ना अशीही शंंका चाहत्यांच्या मनात निर्माण झाली आहे. याशिवाय या फोटोशूटमध्ये मेकअप न करता रिंकूने फोटो काढल्याचं ती हॅशटॅगमधून सांगतेय.

या लुकमध्ये रिंकूला ओळखणही कठीण जातय. मात्र अशा लुकमध्ये रिंकू एखाद्या सिनेमात दिसली तर ती भूमिका लक्षवेधीने ठरेल यात शंका नाही. सोशल मिडीयावर मोठा चाहतावर्ग असलेल्या रिंकूच्या या फोटोंनाही चाहत्यांनी हजारो लाईक्सचा वर्षाव केला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Just. #mood#withoutmakeup#positivevibes.

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive