By  
on  

पाहा Video : 'माझ्या नवऱ्याची बायको'मधील राधिका आणि मायाने केलं हे चॅलेंज

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतील राधिका गुरुपासून दूर झाली असली तरी माया गुरुच्या जवळ येत असल्याचं चित्र पाहायला मिळत. आता तर शनाया आणि गुरुनाथ देखील एकत्र येत असल्याचं पाहायला मिळतय. या सगळ्या गोष्टी मालिकेत होत असल्या तरी या व्यक्तिरेखा साकारत असलेले हे कलाकार ऑफस्क्रिन सगळेच एकत्र येऊन धमाल करतात.

राधिकाच्या भूमिकेतील अनिता दाते केळकर आणि मायाच्या भूमिकेतील रुचिरा जाधव या दोघीदेखील ऑफस्क्रिन चांगल्या मैत्रिणी आहेत. शिवाय सेटवर निवांत वेळेत त्यांची मस्ती सुरु असते. नुकताच या दोघींनी एक व्हिडीओ शूट केलाय. निमित्त होतं एका चॅलेंजचं. डोळ्यांची पापणी न लवता व्हिडीओ करण्याचं हे चॅलेंज होतं. हे चॅलेंज राधिका आणि मायाने उत्तमरितीने पार पाडल्याचं पाहायला मिळतय.

 

नुकतच या मालिकेचं दिवाळी स्पेशल चित्रीकरण करण्यात आलं. याच निमित्ताने मालिकेतील हे कलाकार खास पारंपारिक वेशभुषेत दिसले. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive