By  
on  

पम्मीने सोशल मिडीयावर चाहत्यांना दिली ही खास न्यूज

सोशल मिडीयावर सेलिब्रिटींचे असंख्य फॉलोवर्स असतात. मात्र इन्स्टाग्राम अकाउंटवर अनेक सेलिब्रिटींच्या अकाउंटवर ब्लू टीक म्हणजेच व्हेरिफिकेशनचं चिन्ह पाहायला मिळतं. शेवंता म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरचा देखील सोशल मिडीयावर मोठा चाहतावर्ग आहे. मात्र तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हेरिफिकेशनचं निळ्या रंगाचं चिन्ह नव्हतं. मात्र आता अपूर्वाच्या अकाउंटला हा निळ्या रंगाचा टीक मिळाला आहे. हीच खास बातमी अपूर्वाने सोशल मिडीयाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेयर केली आहे.

निळ्या रंगाचं व्हेरिफिकेशन मिळताच अपूर्वा आनंदी झाली आहे. अशा व्हेरिफिकेशन मिळालेल्या अनेक सेलिब्रिटींपैकी ती एक बनली आहे. सोशल मिडीयावर अपूर्वाच्या पोस्टना हजारोंनी लाईक्स आणि कमेंट्स असतात.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Got verified on Instagram !! Thank you very much @amolghodake_official for technical support !! . . #apurvanemlekar #verified

A post shared by Apurva Nemlekar (@apurvanemlekarofficial) on

 

'तुझं माझं जमतय' या नव्या मालिकेसह अपूर्वा ही आता पम्मी ही व्यक्तिरेखा साकारत आहे. तेव्हा शेवंता प्रमाणेच या पात्रासाठीही तिला पसंती मिळतेय का लवकरच पाहायला मिळेल. सोशल मिडीयावर चर्चेत असणारी अपूर्वा आता पुन्हा एकदा पम्मी या पात्रासाठी चर्चेत आली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive