By  
on  

'डार्लिंग'च्या प्रेमात आहे निखिल चव्हाण, म्हणतो 'आपण तिचा ओन्ली किंग'

'कारभारी लयभारी' या मालिकेतून सध्या अभिनेता निखिल चव्हाण छोटा पडदा गाजवतोय. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या या नव्या मालिकेतून निखिल हा 'लागिरं झालं जी'नंतर पुन्हा एकदा रसिक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्याचसोबत मोठ्य पडद्यावरसुध्दा तो त्याच्या डार्लिंगसोबत दिसणार आहे. 'डार्लिंग' हा निखिलची प्रमुख भूमिका असलेला आगामी सिनेमा आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच उलगडला आहे. 

 'डार्लिंग' चा टीझर शेअर करत म्हणतो, "आरं!! तुझ्या वहिनीसाठी घेतलीये बघं एकदम सॉलिड रिंग,...ती राणी आपल्या काळजाची, आपण तिचा ओन्ली किंग..." या सिनेमातूनसुध्दा निखिल चाहत्यांची मनं जिंकेल यात शंकाच नाही. 

या सिनेमात निखिलची डार्लिंग अभिनेत्री रितिका श्रोत्री आहे, असा अंदाज व्यक्त होतोय. तर अभिनेता प्रथमेश परबसुध्दा या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. आता या तिघांचा लव्ह ट्रॅंगल पाहायला मिळणार का , याची उत्सुकता सर्वांना लागलीय. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

आरं!! तुझ्या वहिनीसाठी घेतलीये बघं एकदम सॉलिड रिंग, ती राणी आपल्या काळजाची, आपण तिचा ओन्ली किंग... #Darling #7Jan2021 Coming To Theatres Near You New Year, New Hope, New Beginning #MissionBeginAgain #पुनश्चहरीओम A Film By: @sameer_asha_patil A Chinar & Mahesh Musical 7 Horse Entertainment Pvt Ltd And V. Patke Films in association with Kathakar Motion Pictures @shrotriritikaofficial @prathameshparab @nikkhhil_29 @chinarkharkar @ogalemaheshofficial @ajaythakur.14 #AmitDhupe @pickleentertainmentandmediapvt @vizualjunkies #VRGMedia

A post shared by Nikkhhil Chavaan (@nikkhhil_29) on

 

 'डार्लिंग'  येत्या 7 जानेवारी 2021 रोजी रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येतेय.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive