अभिनेत्री, नृत्यांगना मानसी नाईक आणि बॉयफ्रेंड प्रदीप खरेरा यांचा नुकताच साखरपुडा पार पडला. या साखरपुड्यानंतरचे फोटो सोशल मिडीयावर पोस्ट करून मानसी नाईकने ही गुड न्यूज सगळ्यांना दिली.
याचवर्षी मानसीने तिच्या वाढदिवसाला ती प्रेमात असल्याची कबुली देत प्रदीपसोबतचे फोटो फोटो पोस्ट केले होते. त्यानंतर सोशल मिडीयावर या दोघांचे फोटो आणि व्हिडीओ चर्चेत राहिले. नुकतच दोघांनी साखरपुड्याची बातमी सोशळ मिडीयावर सांगितली. एवढच नाही तर दोघांनी एक रोमँटिक व्हिडीओही शूट केलाय. मानसीने नुकताच दोघांचा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर शेयर केला आहे.
"तेरे घर आया.." या गाण्यावर प्रदीप आणि मानसीचा हा रोमँटिक व्हिडीओ आहे. एवढच नाही तर लग्नाविषयीही मानसी या पोस्टमध्ये सांगते. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये मानसी लिहीते की, "आम्ही लग्न करतोय." तेव्हा लवकरच मानसी आणि प्रदीप लग्न करणार असल्याचं या पोस्टमधून दिसतय.
मानसी आणि प्रदीप गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून दोघांची ओळख झाली होती. मानसी मराठी मनोरंजन विश्वात अभिनेत्री आणि नृत्यांगना म्हणून प्रसिद्ध आहे तर प्रदीप हा इंटरनॅशनल बॉक्सर आहे.