By  
on  

या मराठी सिनेमाला झाली पाच वर्षे पूर्ण, सिनेमात झळकले होते दिग्गज कलाकार

2015 साली प्रदर्शित झालेल्या कट्यार काळजात घुसली या मराठी सिनेमाला नुकतीच 5 वर्षे पूर्ण झाली आहेत. या ब्लॉकबस्टर सिनेमाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळून पसंतीची पावती मिळाली होती.  या सिनेमाला 5 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या सिनेमाचे दिग्दर्शक आणि अभिनेता सुबोध भावेने खास पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने प्रेक्षकांचे आणि सिनेमाच्या टीमचे आभार मानले आहेत.

सुबोध भावे या पोस्टमध्ये लिहीतो की, "कट्यार प्रदर्शित होऊन ५ वर्ष झाली,या चित्रपटाच्या निर्मिती प्रक्रियेत जो आनंद आमहाला मिळाला तोच आनंद आज ५ वर्षानंतरही मिळत आहे.
निरागस सुरांशी जुळलेलं नात आजही कायम आहे. कट्यार वर भरभरून प्रेम करणाऱ्या तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार आणि खूप प्रेम त्या सर्व दिग्गजांना विनम्र अभिवादन ज्यांच्यामुळे ही कलाकृती जन्मली आणि माझ्या कट्यार च्या संघाचे ही आभार आणि खूप प्रेम कारण त्यांच्या शिवाय हे स्वप्न सत्यात उतरलं नसतं."

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

कट्यार प्रदर्शित होऊन ५ वर्ष झाली, या चित्रपटाच्या निर्मिती प्रक्रियेत जो आनंद आमहाला मिळाला तोच आनंद आज ५ वर्षानंतरही मिळत आहे. निरागस सुरांशी जुळलेलं नात आजही कायम आहे! कट्यार वर भरभरून प्रेम करणाऱ्या तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार आणि खूप प्रेम त्या सर्व दिग्गजांना विनम्र अभिवादन ज्यांच्यामुळे ही कलाकृती जन्मली आणि माझ्या कट्यार च्या संघाचे ही आभार आणि खूप प्रेम कारण त्यांच्या शिवाय हे स्वप्न सत्यात उतरलं नसतं #classicalmusic #devine #soul #zarina #sadashiv #khansaheb #uma #panditji #vishrampur #gheichand #yarilahi #arunikirani #kaviraj #chaand #usmaan

A post shared by Subodh Bhave (@subodhbhave) on

या सिनेमात अभिनेते सचिन पिळगावकर, प्रसिद्ध गायक शंकर महादेवन, सुबोध भावे, स्वप्निल राजशेखर, अमृता खानविलकर, मृण्मयी देशपांडे, पुष्कर श्रोत्री, साक्षी तन्वर हे कलाकार झळकले आहेत. बॉक्स ऑफिसवरही या सिनेमाने 30 कोटींच्या आसपास कमाई केली होती.

या सिनेमाच्या पाच वर्षांच्या आठवणींना सिनेमातील कलाकार सोशल मिडीयाच्या माध्यमातून उजाळा देत आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive